पहिले प्रेम

 

पहिले प्रेम

                      -  वि.स.खांडेकर

           

         प्रत्येकाच्या आयुष्यात गुलाबाप्रमाणे येणार्‍या आणि नंतर काट्याप्रमाणे खोल कुठेतरी सलत राहणार्‍या या पहिल्या प्रेमावरती लिहिलेल्या एका अप्रतिम लेखकाच्या उत्तम साहित्यकृतीचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा नवचैतन्याने पुस्तकांवर लिहायला तयार झालो जे नकळतच काही दिवसांपासून सुटत चालले होते...

         सुरुवातीलातर अगदी विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये लिहिलेल्या गेलेल्या प्रेम विषयावरील कादंबरीचा सध्याच्या so called आधुनिक जगातील प्रेमाशी काय मेळ लागणार म्हणून थोड्याश्या नकारात्मकतेने कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि खांडेकरांच्या विश्वात अक्षरशः हरवून गेलो. १५२ पानांनच्या या पुस्तकातील तब्बल ४५ पानांच्या खांडेकर फक्त तीन प्रस्तावनांसाठी घालवतात पण त्या वाचल्यानंतर त्यातील विचारांची खोली आणि लेखकाची विषयासंबंधी असलेली तळमळ पासून खरचं खांडेकरांविषयी आदर द्विगुणित होतो.

         कादंबरीतील एक एक संवाद प्रेमाविषयी अथवा पहिल्या प्रेमाविषयी आजपर्यंत कुणीही न सांगीतलेलं तत्वज्ञान आपल्यासमोर उभे करतात. पहिलं प्रेम हा एक ज्वालामुखी आहे ! तो शांत झालासा वाटला , तरी पुन्हा केव्हा पेटेल , याचा नेम नाही ! पात्रांचे यासारखे कित्येक उद्गार आपल्याला डायरी पेन उचलून ते लिहून घ्यायला भाग पाडतील याची मी सहज खात्री देऊ शकतो.
यासोबत कादंबरीच्या उरलेल्या १०६ पानांच्या मध्ये लिहिलेली कादंबरीची कथा लेखकाचं खरं कसब आपल्याला दाखवून देते. एकूण तीन वेगवेगळ्या जागी चालणारे वेगवेगळे प्रसंग , वेगवेगळ्या भावभावना या जेव्हा कादंबरीच्या शेवटी एकत्र येऊन प्रेमाविषयी जो उदात्त दृष्टीकोन आपल्यासमोर मांडतात तो १६-२२ वयातील प्रत्येक तरुण-तरुणीची वाचायला व लक्षात घ्यायला हवा असं वाटतं !

         कादंबरी तिच्या प्रेम या मुळ विषयाला हाताळतच पुराव्यांचा शोध घेत घेत एका भावनिकदृष्ट्या महत्तवाच्या केसचा पाठपुरावा करणार्‍या वकिलाचा गुप्तहेराप्रमाणे घेतलेला शोधसुद्धा तितक्याच ताकदीने मांडत आपल्याला कथेपासून क्षणभरही भटकू देत नाही !  तरुणवयात आकर्षण आणि प्रेम यांच्या फरक न करु शकणार्‍या मुलामुलींसाठी लेखक प्रेम आणि आकर्षणाची तुलना अगदी उत्तम करतात ती अशी -

 नुसतं आकर्षण म्हणजे प्रेम नव्हे त्या आकर्षणाचं रुपांतर भक्तीत व्हावं लागतं ! भक्ती म्हणजे दुसर्‍यासाठी स्वतःला विसरण्याची शक्ती ! ज्याला स्वतःच्या सुखाची कल्पना विसरता येत नाही, त्याच्या प्रेमाला भक्तीचं स्वरुप कधीच प्राप्त होत नाही. आकर्षणाचा आत्मा उपयोग आहे. उलट ,भक्तीचा आत्मा त्याग आहे !

हे चार ते पाच ओळीचं वाक्य जरी लक्षात घेतलं तर पहिल्या प्रेमाला (आकर्षणाला) सर्वस्व मानून उत्कर्ष होण्याच्या वयात प्रेमाभंगातून निर्माण झालेल्या देवदासांची संख्या प्रचंड प्रमाणात कमी होईल असं मनातून वाटतं !😁

        असो joke apart पण प्रत्येकाने तरुण वयात आवर्जून वाचावी अशी पहिले प्रेम ही एक उत्तम साहित्यकृती यात कसलाही वाद नाही ! 😃

मग तुम्ही कधी वाचताय किंवा कधी वाचली होती ?😁

©️®️ पार्थ भेंडेकर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

रावण राजा राक्षसांचा