पत्रास कारण की...!
पत्रास कारण की...! सध्याच्या माझ्या पिढीने अनेक नवीन गोष्टी तंत्रज्ञान फार जवळून पाहिलय अनुभवलय पण अनेक मजेशीर आणि सुंदर गोष्टी मात्र आमच्या पिढीने फक्त लुप्त होताना दुरूनच पाहिल्यात त्यातीलच एक सुंदर गोष्ट म्हणजे पत्र ! तेच पत्र जे प्रियकर प्रेयसीच्या जगण्याचं एक महत्तवाचं साधन होतं, सैनिकांसाठी व त्यांच्या घरच्यांसाठी जगण्याचा आधार, आशा होतं, तेच पत्र अत्यांतिक आनंद देणारही असायचं आणि अनपेक्षीत दुःख देणारं सुद्धा ! पण अरविंद जगताप आणि चला हवा येऊ द्या च्या संपूर्ण अवलिया टिमने आमच्या पिढीला पत्रांच्या फार जवळ आणत त्यांचं महत्तव पटवून दिलं आणि आमच्या आधीच्या पिढीच्या जुन्या आठवणीमध्ये हरवून जायला भाग पाडलं ! याच पत्रांचा संग्रह म्हणजे पत्रास कारण की...! आता पत्र म्हणलं की ते भावनिकचं असेल असं मला पुस्तक वाचण्याआधी वाटायचं पण एक प्रचंड सामाजिक जाण असलेला लेखक तख्तालाही प्रश्न विचारण्याचं धाडस त्याच्या लेखणीतून कशा प्रकारे करु शकतो याची अनुभूती मला यातील अनेक पत्र वाचल्यानंतर आली. पुस्तकातील अ...