पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रावण राजा राक्षसांचा

इमेज
रावण राजा राक्षसांचा लेखक - शरद तांदळे कोणत्याही कथेचा नायक किती महान आहे हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या खलनायकाच्या सामर्थ्याची कल्पना असणं गरजेचं असतं त्यामुळे प्रभू रामाची महानता आणखी चांगली समजून घेण्यासाठी आपल्याला रावणसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. इतिहास लिहितानासुद्धा जिंकलेल्या बाजूसोबत हरलेल्या बाजूचा इतिहास सुद्धा लिहिला गेला पाहिजे. रावण : राजा राक्षसांचा ही शरद तांदळे सरांची कादंबरी अश्याच प्रकारे रावणाच्या जीवनाला न्याय देण्याची यशस्वी प्रयत्न करते आणि या यशाचे आपण सर्वजण वाचक साक्षीदार आहोतचं ! आजपासून दोन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा रावण वाचलेला तेव्हा यावर लिहिण्याचा योग आला नाही पण आज परत एकदा रावण कादंबरी वाचून संपवली आणि पुस्तकाबद्दल लिहायला बसलो. विश्रवाच्या आश्रमामध्ये जन्म झालेल्या दशाग्रीव या संकरीत (आर्य-अनार्य दोघांपासून झालेल्या) मुलाचा राक्षसांचा सम्राट 'रावण' बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे रावण ही कादंबरी.  कादंबरीच्या सुरुवातीपासूनच लेखक पूर्णपणे आपल्याला दशाग्रीवाच्या जीवनाशी जोडतात आणि आपण त्याच्या सोबत त्याच्या आयुष्याचा संपूर...