द अल्केमिस्ट
द अल्केमिस्ट
-स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवणारे अद्भुत पुस्तक
अल्केमिस्ट म्हणजे एक कथा त्यासोबतच जीवनाबाबत ते तत्त्वज्ञान जे माणसाला आपले उचित ध्येय निवडण्यासाठी व गाठण्यासाठी खूप मदत करते.पुस्तकामध्ये लेखक पाउलो कोएलो सॅन्तियागो या मुलाच्या अनुशंगाने आपल्याला अनेक गोष्टींची ज्ञान करुन देतात.जसे निसर्गातील प्रत्येक गोष्ट कशाप्रकारे आपल्याला आपल्या ध्येयामध्ये मदत करु शकते ,कोणतीही गोष्ट घडण्यामागे काय कारण असु शकते, इ.
अल्केमिस्टच्या कथेबाबत सांगणे किंवा लिहिणे मला उचित वाटत नाही कारण आपणा सर्व सुज्ञ वाचकांची पुस्तकाविषयीची उत्कंठा कमी होता कामा नये.पण एवढे नक्की सांगतो अल्केमिस्टची गोष्ट वाचकाला अशाप्रकारे खिळवून ठेवते की पुस्तकाच्या प्रत्येक प्रसंगामध्ये आपण स्वतःच्या अनुभवतो.हेच या पुस्तकाचे सर्वात मोठे यश आहे.पुस्तकातील प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो.हे पुस्तक त्या मुलांसाठी, तरुणांसाठी तर अत्यंत उपयोगी पडेल ज्यांना आयुष्यात काय ध्येय साध्य करायचे आहे हे माहीत नाही किंवा त्यांनी त्यांचे ध्येय कोणाच्या सांगण्यावरुन ठरवले आहे.
पुस्तकामध्ये शकुन ( निसर्गामध्ये आपल्या भवितव्याला आकार देण्यासाठी घडणार्या घटना ) व त्यांची भाषा आपल्याला पुस्तक वाचल्यानंतर समजेल की नाही हे माहीत नाही पण मला personally पुस्तकाने दोन गोष्टी मात्र शिकवल्या. १.जेव्हा आपण आपल्या मनाची हाक ऐकूण आपल्या भवितव्याचा पाठलाग करु लागतो तेव्हा निसर्गासहित संपूर्ण जग आपल्याला यात मदत करते. २.जगात वाईट अशी कोणती गोष्टच नाही जे होते चांगल्यासाठीच होते.
द अल्केमिस्ट फक्त एका मेंढपाळाने केलेल्या खजिन्याच्या शोधाची गोष्ट नसून वाचकांना ज्ञानाचा अमाप भांडार देऊ करणारा एक खजिनाच आहे. यात शंका नाही पुस्तक वाचल्यानंतर जीवनात पुढे काय करावे हा प्रश्न तर डोक्यात मुळीच राहणार नाही तेव्हा. सध्या आपल्या आयुष्याचा मार्ग निवडणार्या मुलांनी तर हे पुस्तक नक्की वाचायलाच हवे. माझी तर भूक एकदा वाचून भागणार नाही, मी परत वाचतोय.आता तुम्ही वाचणार की नाही?
©®पार्थ भेंडेकर
Booktapri kharcha bhari title aahe ...ankhi kahi navin books cha lihi aavdel vachyala.
उत्तर द्याहटवा