रारंगढांग
रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर पांढराशुभ्र हिमालय ताठ मानेने अनेक वर्ष उभा आहे. काश्मिरी भागात उंच खडे कडे आणि त्यांच्या एका बाजूला खोल दरीत फेसाळणारी सतलज इथल्या गोर्यागोमट्या माणसांचं आयुष्य खरंतर अगदीच सामान्य ; पण स्वैर अशा निसर्गामुळे असामान्य बनतं, अशा ठिकाणी रस्ते बांधायचे म्हणजे मोठ जोखमीचं काम आणि म्हणूनच तिथे सैन्याची शिस्त महत्त्वाची! छोट्यात छोटी गोष्टसुद्धा नियमात बसूनच व्हावी हा यांचा बाणा. त्यातच तिथे ले. विश्वनाथ मेहेंदळे येतो आणि कथा सुरू होते. अतिशय स्थिर, शांत, ...