गुलमोहर

 

 गुलमोहर

 वपुंच्या कथा म्हणजे अगदी रोजच्या जीवनातून घेतलेले अगदी सहज प्रसंग आणि त्याच्या जोडीला मानवी भावनांची वेचक मांडणी ! या सहजतेमुळे आणि वपुंच्या विशिष्ट कथालेखनाच्या शैलीमुळेच त्यांच्या कथा प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेण्यात अगदी यशस्वी ठरतात. त्यांच्या कथांमधून एरवी दुर्लक्षित असणाऱ्या घटनांचेही बारकाईने दर्शन घडते गुलमोहर हा कथासंग्रह सुक्षा याला अपवाद नाही.

या कथासंग्रहामध्ये खासकरून माणसांमधील नात्यांची विण कशी कधी घट्ट- सैल, कधी गुंतलेली - सुटलेली किंवा कधी नवजीवन देणारी ठरते याचा प्रत्यय येतो. 'गांधारी', 'अढळपद', 'शिळा आहिल्या' या अशाच काही कथा, त्या वाचताना मनातल्या भावनांचे, विचारांचे वावटळ लेखक उभे करतात...वाचक त्यात अगदी सहज त्यात वाट चुकतो, हरवतो, आनंदतो आणि हे हीच वेळ जेव्हा वपु आपले कौशल्य दाखवतात.

लपाछपीच्या खेळात ज्याच्यावर राज्य असते, तो जर एकाच कोणाला तरी शोधू लागला तर बाकीच्या खेळणाच्यांकडे त्याचे लक्ष्य जात नाही आणि मग कुणीतरी दबक्या पावलांनी जाऊन त्याला 'धप्पा' देते. असाच धप्पा वपु वेळोवेळी वाचकांना देतात. आपण कथेचा एक धागा घेऊन वाचावं पण शेवटी त्याच नव्या धान्याने कथा उलगडते असे होते. 'भरती', 'एकटा, 'दहावा सह' या कथा वाचताना हे जाणवते.

अर्थात अगदी शेवटपर्यंत वाचकांना खिळवून ठेवणे हा वपुंचा हातखंडा ! याचा स्वतःहून प्रत्यय करुन घेण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.

-स्वामिनी हर्षे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

बाई, बायको, कॅलेंडर !

पहिले प्रेम