पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आतला आनंद

इमेज
आतला आनंद - शान्ता ज. शेळके      शान्ता शेळके हे तसं सर्व मराठी वाचकांना ओळखीचं नाव. फिकट रंगातलं नक्षीदार लुगडं, डोक्यावरून कधीही न ढळणारा पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू, मोठ्या फ्रेमचा चष्मा, आणि सदा प्रफुल्लित व्यक्तिमत्व. ललितलेखन, कविता, चित्रपट संगीत, अनुवाद, कादंबरी लेखन अश्या अनेक साहित्य प्रकारांत मुशाफिरी करून शान्ता ताई रमल्या ते कवितांमध्ये. माझी शान्ता ताईंशी ओळख झाली ती 'आतला आनंद' या पुस्तकामुळेच.      जानेवारी ते डिसेंबर २००१ या काळात त्यांनी सकाळ वृत्तपत्रात 'दीपमाळ' या सदरात ५२ ललित लेख लिहिले, त्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. ५२ लेख म्हटल्यानंतर पुस्तक खूप लांबलचक असेल असा आपला गैरसमज होऊ शकतो पण शान्ता ताईंना गप्पा मारण्याची भारी हौस. या पुस्तकाच्या माध्यमातून त्या वाचकांशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यामुळे पुस्तक कधी संपते आपल्यालाच समजत नाही. 'एक झेन कथा', 'नात्याचा घट्ट पीळ', 'खिडक्या बंद की उघड्या ?" असे काही बोधपर लेख, तर 'पत्रे...प्रेमपत्रे', 'प्रेमातले डावे उजवे', 'हसू हरवले आहे का ?' असे काही ...

बाई, बायको, कॅलेंडर !

इमेज
बाई, बायको, कॅलेंडर !                          - व.पु.काळे  1 कथासंग्रह 15 कथा...वेगवेगळा आशय-विषय आणि वेगवेगळ्या मानवी भावनांवर प्रकाश टाकणारी कथांची मांडणी म्हणजे एकूण बाई, बायको, कॅलेंडर हा वपुंचा कथासंग्रह !  पुस्तकचं मुखपृष्ट आणि शीर्षक पाहिल्यावर लगेचचं विनोदी कथासंग्रह आहे याचा अंदाज आला आणि पुस्तक घेतलं आणि वाचायला लागलो ! वपु म्हणलं की रोजच्या दैनंदिन जीवनाचं तत्वज्ञान उलगडणारे लेखक हे आतापर्यंतच्या वाचनातून माझा झालेला समज पण जीवनाकडे इतक्या बारकाईने पाहणारे निरिक्षण करणारे वपु आपल्या आजुबाजूच्याच लहान-सहान गोष्टींवरुनही कश्याप्रकारे विनोद शोधून आपल्यासमोर मांडतात हे पाहणं म्हणजे या पुस्तकाचं मुख्य आकर्षण आणि ओळखही !  कथासंग्रहातल्या सर्वच कथा एका वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन आपल्यासमोर येतात मग कधी तो कॅलेंडरमधून जिंवत होणार्‍या बाईमुळे निर्माण झालेल्या फजितीचा असेल तर कधी टाईट पँटमुळे घडलेल्या गोंधळाचा असेल पण त्या विषयांमधील आणि कथांमधिल एक साम्य म्हणजे प्रत्येकचं कथा वाचकाल...