पोस्ट्स

जून, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

द अल्केमिस्ट

इमेज
 द अल्केमिस्ट                                        -स्वप्नांचा पाठलाग करायला शिकवणारे अद्भुत पुस्तक               अल्केमिस्ट म्हणजे एक कथा त्यासोबतच जीवनाबाबत ते तत्त्वज्ञान जे माणसाला आपले उचित ध्येय निवडण्यासाठी व गाठण्यासाठी खूप मदत करते.पुस्तकामध्ये लेखक पाउलो कोएलो सॅन्तियागो या मुलाच्या अनुशंगाने आपल्याला अनेक गोष्टींची ज्ञान करुन देतात.जसे निसर्गातील प्रत्येक गोष्ट कशाप्रकारे आपल्याला आपल्या ध्येयामध्ये मदत करु शकते ,कोणतीही गोष्ट घडण्यामागे काय कारण असु शकते, इ.                            अल्केमिस्टच्या कथेबाबत सांगणे किंवा लिहिणे मला उचित वाटत नाही कारण आपणा सर्व सुज्ञ वाचकांची पुस्तकाविषयीची उत्कंठ...

दोन मने

इमेज
 दोन मने                                         -वि.स.खांडेकर जीवन ही लढाई आहे. जीवन हा यज्ञ आहे. जीवन हा सागर आहे. जखमांवाचून लढाई नाही. ज्वालेवाचून यज्ञ नाही. वादळावाचून सागर नाही.              खांडेकरांच्या दोन मनेमधील हे वाक्य डोक्यात सतत गिरट्या घालत आहे....नव्हे नव्हे संपूर्ण कादंबरीच डोक्यामध्ये थैमान घालत आहे. त्यामुळे कादंबरीतील प्रत्येक पात्र बाळासाहेब, चपला, आगटे, श्री सगळीच कादंबरी वाचतानाही आणि वाचून संपल्यानंतरही आपलीच वाटत आहेत.             दोन मने हे नाव वाचताच मनात ही मानवी भावनांच्या किंवा मानसशास्त्राच्या धरतीवर लिहिलेली एक कादंबरी असावी असे वाटले होते परंतू जसे जसे कादंबरी वाचत गेले तसे तसे त्यातील सामाजिक बाजूचे दर्शन घडत गेले. विसाव्या शतकातील अस्पृश्यता, दलितांचे होणारे हाल आणि त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तरुण श्रीची चालू असलेली धडपड हे सर्व पाहून आपण ही परिस्थिती आपल्या डोळ...

हुंकार

इमेज
हुंकार                  -व.पु.काळे                वपु ! मराठी वाचन संस्कृतीतील क्वचितच लोक असतील ज्यांना हे नाव माहित नाही. हुंकार हा कथासंग्रह मी वाचलेलं वपुचं तिसरं पुस्तक ! वपुंच्या व्यक्तीमत्तवाचे अनेक पैलु आपल्याला दिसतात एक उत्कृष्ट कथाकार , तत्तवज्ञ , विचारवंत हे त्यातीलच काही. असो वपुंसारख्या सागराचं वर्णन मी काय करावं तर मी येतो मुद्द्यावर अर्थात हुंकारवर !               वपुंच्या कथा कधी वाचकाला हसवतात कधी रडवतात तर कधी वाचकांशी तासनतास नुसतं हितगुज करतात, बोलत राहतात. प्रत्येक कथा वाचल्यानंतर विचार केला नाही तर कथा समजणे आणि त्यातील संदेश घेणे थोडं अवघडच ! मी हुंकार हा कथासंग्रह चार दिवसापूर्वीच वाचून वेगळा केला. काय तो अनुभव ! एक वेगळचं जग वपुंच्या कथांमधून अनुभवायला मिळतं. 17 कथांचा हा संग्रह आपल्या प्रत्येक कथेत काहीतरी वेगळेपणा देऊन जातो. यातील पहिलीच कथा हुंकार. ही कथा म्हणजे पुढच्या मेजव...

पहिले प्रेम

इमेज
  पहिले प्रेम                       -  वि.स.खांडेकर                      प्रत्येकाच्या आयुष्यात गुलाबाप्रमाणे येणार्‍या आणि नंतर काट्याप्रमाणे खोल कुठेतरी सलत राहणार्‍या या पहिल्या प्रेमावरती लिहिलेल्या एका अप्रतिम लेखकाच्या उत्तम साहित्यकृतीचा आस्वाद घेतला आणि पुन्हा एकदा नवचैतन्याने पुस्तकांवर लिहायला तयार झालो जे नकळतच काही दिवसांपासून सुटत चालले होते...          सुरुवातीलातर अगदी विसाव्या शतकाच्या मध्यामध्ये लिहिलेल्या गेलेल्या प्रेम विषयावरील कादंबरीचा सध्याच्या so called आधुनिक जगातील प्रेमाशी काय मेळ लागणार म्हणून थोड्याश्या नकारात्मकतेने कादंबरी वाचायला सुरुवात केली आणि खांडेकरांच्या विश्वात अक्षरशः हरवून गेलो. १५२ पानांनच्या या पुस्तकातील तब्बल ४५ पानांच्या खांडेकर फक्त तीन प्रस्तावनांसाठी घालवतात पण त्या वाचल्यानंतर त्यातील विचार...