पोस्ट्स

रावण राजा राक्षसांचा

इमेज
रावण राजा राक्षसांचा लेखक - शरद तांदळे कोणत्याही कथेचा नायक किती महान आहे हे चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपल्याला कथेच्या खलनायकाच्या सामर्थ्याची कल्पना असणं गरजेचं असतं त्यामुळे प्रभू रामाची महानता आणखी चांगली समजून घेण्यासाठी आपल्याला रावणसुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. इतिहास लिहितानासुद्धा जिंकलेल्या बाजूसोबत हरलेल्या बाजूचा इतिहास सुद्धा लिहिला गेला पाहिजे. रावण : राजा राक्षसांचा ही शरद तांदळे सरांची कादंबरी अश्याच प्रकारे रावणाच्या जीवनाला न्याय देण्याची यशस्वी प्रयत्न करते आणि या यशाचे आपण सर्वजण वाचक साक्षीदार आहोतचं ! आजपासून दोन वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा रावण वाचलेला तेव्हा यावर लिहिण्याचा योग आला नाही पण आज परत एकदा रावण कादंबरी वाचून संपवली आणि पुस्तकाबद्दल लिहायला बसलो. विश्रवाच्या आश्रमामध्ये जन्म झालेल्या दशाग्रीव या संकरीत (आर्य-अनार्य दोघांपासून झालेल्या) मुलाचा राक्षसांचा सम्राट 'रावण' बनण्यापर्यंतचा प्रवास म्हणजे रावण ही कादंबरी.  कादंबरीच्या सुरुवातीपासूनच लेखक पूर्णपणे आपल्याला दशाग्रीवाच्या जीवनाशी जोडतात आणि आपण त्याच्या सोबत त्याच्या आयुष्याचा संपूर

तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा

इमेज
तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा -पीयूष मिश्रा      पीयूष मिश्रा नाम मुझे पहली बार गुलाल के गाने 'आरंभ है प्रचंड' के कारण पता चला।  इसके बाद एक बगल में चांद होगा....घर...हुस्ना गाने सुने और एक गायक, गीतकार और संगीतकार के रूप में इस शख्स के प्रशंसक बन गए।  फिर धीरे-धीरे यूट्यूब पर इस शख्स के कई इंटरव्यू सुनने के बाद मुझे एहसास हुआ कि वह कितने अद्भुत इंसान हैं, इसलिए मैंने थोड़ा और जानने का फैसला किया तब मेरे हात आया.... तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा।  पीयूष मिश्रा का आत्मकथात्मक उपन्यास।         किताब शुरू हुई और मैंने पीयूष मिश्रा को उनके अनोखे अंदाज में सुनना शुरू किया....जैसे वह सचमुच मेरे सामने बैठे अपनी कहानी सुना रहे हों।  जैसा कि मैंने ऊपर बताया, यह किताब एक आत्मकथात्मक उपन्यास है, क्योंकि इसमें खुद पीयूष मिश्रा सहित कई वास्तविक लोगों के नाम थोडे मोड मरोडकर, काल्पनिक तरिके इस तरह लिखे गए हैं कि हम उन्हें आसानी से समझ सकते हैं । पूरी किताब में पीयूष मिश्रा खुद को संतप त्रिवेदी और हेमलेट कहते हैं और दोनों नाम इस व्यक्ति पर बिल्कुल फिट बैठते हैं।         किताब के प

आतला आनंद

इमेज
आतला आनंद - शान्ता ज. शेळके      शान्ता शेळके हे तसं सर्व मराठी वाचकांना ओळखीचं नाव. फिकट रंगातलं नक्षीदार लुगडं, डोक्यावरून कधीही न ढळणारा पदर, कपाळावर ठसठशीत कुंकू, मोठ्या फ्रेमचा चष्मा, आणि सदा प्रफुल्लित व्यक्तिमत्व. ललितलेखन, कविता, चित्रपट संगीत, अनुवाद, कादंबरी लेखन अश्या अनेक साहित्य प्रकारांत मुशाफिरी करून शान्ता ताई रमल्या ते कवितांमध्ये. माझी शान्ता ताईंशी ओळख झाली ती 'आतला आनंद' या पुस्तकामुळेच.      जानेवारी ते डिसेंबर २००१ या काळात त्यांनी सकाळ वृत्तपत्रात 'दीपमाळ' या सदरात ५२ ललित लेख लिहिले, त्याचा संग्रह म्हणजे हे पुस्तक. ५२ लेख म्हटल्यानंतर पुस्तक खूप लांबलचक असेल असा आपला गैरसमज होऊ शकतो पण शान्ता ताईंना गप्पा मारण्याची भारी हौस. या पुस्तकाच्या माध्यमातून त्या वाचकांशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यामुळे पुस्तक कधी संपते आपल्यालाच समजत नाही. 'एक झेन कथा', 'नात्याचा घट्ट पीळ', 'खिडक्या बंद की उघड्या ?" असे काही बोधपर लेख, तर 'पत्रे...प्रेमपत्रे', 'प्रेमातले डावे उजवे', 'हसू हरवले आहे का ?' असे काही

बाई, बायको, कॅलेंडर !

इमेज
बाई, बायको, कॅलेंडर !                          - व.पु.काळे  1 कथासंग्रह 15 कथा...वेगवेगळा आशय-विषय आणि वेगवेगळ्या मानवी भावनांवर प्रकाश टाकणारी कथांची मांडणी म्हणजे एकूण बाई, बायको, कॅलेंडर हा वपुंचा कथासंग्रह !  पुस्तकचं मुखपृष्ट आणि शीर्षक पाहिल्यावर लगेचचं विनोदी कथासंग्रह आहे याचा अंदाज आला आणि पुस्तक घेतलं आणि वाचायला लागलो ! वपु म्हणलं की रोजच्या दैनंदिन जीवनाचं तत्वज्ञान उलगडणारे लेखक हे आतापर्यंतच्या वाचनातून माझा झालेला समज पण जीवनाकडे इतक्या बारकाईने पाहणारे निरिक्षण करणारे वपु आपल्या आजुबाजूच्याच लहान-सहान गोष्टींवरुनही कश्याप्रकारे विनोद शोधून आपल्यासमोर मांडतात हे पाहणं म्हणजे या पुस्तकाचं मुख्य आकर्षण आणि ओळखही !  कथासंग्रहातल्या सर्वच कथा एका वेगळ्या प्रकारचा विषय घेऊन आपल्यासमोर येतात मग कधी तो कॅलेंडरमधून जिंवत होणार्‍या बाईमुळे निर्माण झालेल्या फजितीचा असेल तर कधी टाईट पँटमुळे घडलेल्या गोंधळाचा असेल पण त्या विषयांमधील आणि कथांमधिल एक साम्य म्हणजे प्रत्येकचं कथा वाचकाला खळखळून हसवते ! 'हेअरस्टाइल', 'पेन सलामत तो-' किंवा स्टॅटिस्टिक्स सुदर्शनची 'न

Sita’s Sister

इमेज
 Sita’s Sister Urmila, King Janak's second daughter, Lakshman's wife and Sita's Sister is one of the most underrated characters of Ramayana. Kavita Kane the author of this utterly absorbing  book has explored all the possible aspects of Urmila, the most protective and level headed sister. From her childhood itself she had been instructed to accept whatever ever she got it life, she was trained to be strong and responsible. She was a great artist, a fierce lady and an extraordinary scholer, she would rather debate with her father than gossiping with the maids.  Sita was loved and pampered more because Janak never wanted her to feel that she was an adopted child. Besides he also had to take care of his brother's daughters (Mandvi and Shutkirti). Despite the fact that she deserved all the love, care, attention and pampering from her parents, she had to share it with her sisters and she never complained about it and accepted this gracefully and took it in h

गुलमोहर

इमेज
   गुलमोहर  वपुंच्या कथा म्हणजे अगदी रोजच्या जीवनातून घेतलेले अगदी सहज प्रसंग आणि त्याच्या जोडीला मानवी भावनांची वेचक मांडणी ! या सहजतेमुळे आणि वपुंच्या विशिष्ट कथालेखनाच्या शैलीमुळेच त्यांच्या कथा प्रत्येक वाचकाच्या मनाचा ठाव घेण्यात अगदी यशस्वी ठरतात. त्यांच्या कथांमधून एरवी दुर्लक्षित असणाऱ्या घटनांचेही बारकाईने दर्शन घडते गुलमोहर हा कथासंग्रह सुक्षा याला अपवाद नाही. या कथासंग्रहामध्ये खासकरून माणसांमधील नात्यांची विण कशी कधी घट्ट- सैल, कधी गुंतलेली - सुटलेली किंवा कधी नवजीवन देणारी ठरते याचा प्रत्यय येतो. 'गांधारी', 'अढळपद', 'शिळा आहिल्या' या अशाच काही कथा, त्या वाचताना मनातल्या भावनांचे, विचारांचे वावटळ लेखक उभे करतात...वाचक त्यात अगदी सहज त्यात वाट चुकतो, हरवतो, आनंदतो आणि हे हीच वेळ जेव्हा वपु आपले कौशल्य दाखवतात. लपाछपीच्या खेळात ज्याच्यावर राज्य असते, तो जर एकाच कोणाला तरी शोधू लागला तर बाकीच्या खेळणाच्यांकडे त्याचे लक्ष्य जात नाही आणि मग कुणीतरी दबक्या पावलांनी जाऊन त्याला 'धप्पा' देते. असाच धप्पा वपु वेळोवेळी वाचकांना देतात. आपण कथेचा एक धा

रारंगढांग

इमेज
 रारंगढांग                                                                          - प्रभाकर पेंढारकर          पांढराशुभ्र हिमालय ताठ मानेने अनेक वर्ष उभा आहे. काश्मिरी भागात उंच खडे कडे आणि त्यांच्या एका बाजूला खोल दरीत फेसाळणारी सतलज इथल्या गोर्‍यागोमट्या माणसांचं आयुष्य खरंतर अगदीच सामान्य ; पण स्वैर अशा निसर्गामुळे असामान्य बनतं, अशा ठिकाणी रस्ते बांधायचे म्हणजे मोठ जोखमीचं काम आणि म्हणूनच तिथे सैन्याची शिस्त महत्त्वाची! छोट्यात छोटी गोष्टसुद्धा नियमात बसूनच व्हावी हा यांचा बाणा. त्यातच तिथे ले. विश्वनाथ मेहेंदळे येतो आणि कथा सुरू होते.      अतिशय स्थिर, शांत, नव्या व उमद्या विचारांचा विश्वनाथ स्वतंत्रपणे काम करावे म्हणून पदोपदी आर्मीच्या शिस्तीला आव्हान देतो. त्याची नेमणूक रारंगढांगातून जाणाऱ्या रस्त्यावर होते. या बांधकामामध्ये असलेला धोका वरिष्ठयांच्या नजरेसमोर आणतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष होतं. आणि मग जे व्हायचं तेच होते - अपघात ! आणि त्या अपघातामुळे सात जीव निष्प्राण होतात. तेव्हा त्यांच्या नावाचे सात आणि जास्तीचा खांब विश्वनाथ परस्पर बांधून टाकतो. हे बेकायदेशीर असूनही अने

बकुळा

इमेज
बकुळा    बकुळा....पुस्तक हातात पडलं आणि मुखपृष्टावरचं वाक्य वाचलं, 'श्रीमती आणि श्रीकांतच्या प्रेमाची साक्ष - बकुळा ' आता हे वाक्य वाचल्यानंतर कोणत्याही सामान्य व्यक्तीप्रमाने मला कादंबरी एक प्रेमकथा आहे असचं वाटलं जी ती आहेसुद्धा ; पण ह्या कादंबरीला फक्त प्रेमकथा मी मुळीच म्हणणार नाही कारण ही मानवी वृत्तीचं एक वास्तवदर्शी दर्शन आहे.       कादंबरीमध्ये अर्थातच श्रीमती आणि श्रीकांत हे दोन मुख्य पात्र आहेत. ज्यांच्यातील प्रेम, स्नेह आपल्याला त्यांच्या बालपणीपासून वाचावयास मिळाल्याने आपण या दोघांशीही बर्‍याच प्रमाणात स्वतःला जोडून घेतो. काही किस्से तर एवढे जवळचे वाटतील की श्रीकांत-श्रीमती विसरुन तुम्हाला शाळेतला एखादा किस्सा नाही आठवला तर नवल ! सोबतच कादंबरीमध्ये रेखाटलेली इतर पात्रसुद्धा आपल्याला आपल्यातीलच वाटतात, यामागील कारण आहे पात्रांचा अगदी सुयोग्यपणे रेखाटलेला स्वभाव !       दोघांच्या बालपणातील प्रेमाचे किस्से आणि त्यांच्यातील किंवा मुला मुलींच्या गटातील कळत -नकळत चालु असलेली स्पर्धा पाहून तितकचं भारी वाटतं जितकं जुन्या मित्रांसोबत बसून जुन्या आठवणी ताज्या करताना वाटतं.

पत्रास कारण की...!

इमेज
पत्रास कारण की...!   सध्याच्या माझ्या पिढीने अनेक नवीन गोष्टी तंत्रज्ञान फार जवळून पाहिलय अनुभवलय पण अनेक मजेशीर आणि सुंदर गोष्टी मात्र आमच्या पिढीने फक्त लुप्त होताना दुरूनच पाहिल्यात त्यातीलच एक सुंदर गोष्ट म्हणजे पत्र !         तेच पत्र जे प्रियकर प्रेयसीच्या जगण्याचं एक महत्तवाचं साधन होतं, सैनिकांसाठी व त्यांच्या घरच्यांसाठी जगण्याचा आधार, आशा होतं, तेच पत्र अत्यांतिक आनंद देणारही असायचं आणि अनपेक्षीत दुःख देणारं सुद्धा ! पण अरविंद जगताप आणि चला हवा येऊ द्या च्या संपूर्ण अवलिया टिमने आमच्या पिढीला पत्रांच्या फार जवळ आणत त्यांचं महत्तव पटवून दिलं आणि आमच्या आधीच्या पिढीच्या जुन्या आठवणीमध्ये हरवून जायला भाग पाडलं ! याच पत्रांचा संग्रह म्हणजे पत्रास कारण की...!         आता पत्र म्हणलं की ते भावनिकचं असेल असं मला पुस्तक वाचण्याआधी वाटायचं पण एक प्रचंड सामाजिक जाण असलेला लेखक तख्तालाही प्रश्न विचारण्याचं धाडस त्याच्या लेखणीतून कशा प्रकारे करु शकतो याची अनुभूती मला यातील अनेक पत्र वाचल्यानंतर आली. पुस्तकातील अनेक भावनिक पत्र नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या करतातच पण जेव्हा लेखक एख

Life's Amazing Secrets

इमेज
  Life's Amazing Secrets    As a book lover I am always in search of new books, almost every week...! And then one day when I was surfing in internet for the same, a book caught my attention, entitled "Life's Amazing Secrets" by Gaur Gopal Das! On the coverpage it was mentioned that the book is a ‘National Bestseller’ which made me curious about its content. Moreover, the title of the book, ‘Life’s Amazing Secrets’ fascinated me and forced me to check it out once. And after all…who would ignore a book written by the renowned author, Gaur Gopal Das. All these attractions convinced my heart to purchase the book at any cost!   As Paulo Coelho Sir says in Alchemist that "when you want something, all the universe conspires to help you achieve it." And it really happened. My mom, who is everything for me, gifted me the same book the next day on my birthday….!!! Call it a coincidence, nevermind…, but I was really very overwhelmed.     In no time I start